उचकी

शाळा सुटायची वेळ झाली होती,
 तेवढ्यात उचकीला माझ्या चाहूल लागली होती...
अशी उचकी मला कधी लागलीच नव्हती,
पाणी पिल्यानंतर ही साथ सोडत नव्हती...

प्रत्येक प्रेमळ व्यक्तींची नावे,
एकामागे एक आठवत होतो....
लागलीच तिचं नाव आठवल्याने,
त्या उचकीला टाटा बाय-बाय करत होतो...

तिने माझी आठवण काढली,
माहित नाही रागाने की प्रेमाने....
यावरून पुन्हा तिची आठवण काढली,
माझ्या या वेड्या मनाने..

या अगोदर वाटायचं,
उचकी ही अंधश्रद्धा असते...
पण या उचकीने सिद्ध केलं,
उचकी हि तर एक आठवण असते...

 *ओमकार & प्रविण *
    9853282222
    9172513251

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हरवलेलं आयुष्य

आता