आता



होय मी दमलोय आता
जरासा थांबलोय आता

या स्वार्थी दुनियेत
एकटा रमलोय आता

तू असशील परिपूर्ण
मी कुठे जमलोय आता

लढून या अन्यायाशी
जरासा थकलोय आता

रोजच्या या दुराचाराने
पुरता चिडलोय आता

करेन भरपूर काही
जरासा विसावलोय आता

शेवट झाला जरी आज
आयुष्य भरभरून जगलोय आता

ओमकार & प्रविण 
 9853282222
 9356045939

टिप्पण्या

Vikrant Shanke म्हणाले…
प्रवीणजी खुप मस्त
Pravin Jadhav म्हणाले…
धन्यवाद विक्रांतजी....😊😊
Unknown म्हणाले…
अप्रतिम कविता मित्रा😘
Pravin Jadhav म्हणाले…
धन्यवाद प्रमोद भाई....😊😊
Unknown म्हणाले…
उत्कृष्ट लिहीतोय🤝❤
Pravin Jadhav म्हणाले…
धन्यवाद भाई...😊😊

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हरवलेलं आयुष्य

उचकी