पोस्ट्स

लावला जीव किती

लावला जीव किती तुझ्यावरी चुकले माझे हिशोब मात्र आयुष्याचे सारे  हुकले माझे मागू आणखी किती दिवस तुला देवाकडे फार झालं आता हात ही हे थकले माझे निर्णय घेतलासच मला सोडण्याच्या तू यापुढे नशिबही हे आता झुकले माझे लावावीसी वाटली हजेरी तुझ्या लग्नाला पाय मात्र थोड्याच अंतरी रुकले माझे एवढे दुःख माझ्याच नशीब का रे देवा जणू सुख सार कुठे तरी तू विकले माझे © प्रविण जाधव

बा...!

इमेज
दिसता तुज पायाच्या भेगा, फार टोचतात माझ्या काळजा; मज लाड पुरविण्यास बा, सोसल्या तू कैक इजा.. राब राब राबतो तू, कसली रे तुझी ही सजा; सार विश्व मरेन भुकेनं,  जर झालास तू वजा.. घामावरी करीतो तू शेती, तव भेटत यासनी खायला; पर बा येईल का रे कोणी ? निस्तराया तुझ्या या दुःखाला.. कळेना तुज काही सण-वार, दिसरात शेतामंदीच खपतो; बनेल असल तुझं फाटलेलं, मज मात्र इमानदारी शिकवितो.. दुष्काळात दिसतो बा मज, वाळक्या बाभळीस तू टांगलेला; राजकारण्यांना नाही परवा याची, खेळ त्यांचा टिकांचा रंगलेला.. बा सांगुन दे त्या निधड्या सरकारला, नको कर्ज, फकस्त पिकास योग्य भाव द्या; लागलच तुम्हाला कधी तर, माझ्यापासनं लागलं तेवढं कर्ज घ्या.. प्रविण & ओमकार 9853282222 9356045939

बाकी आहे

विसावलो नाही, धावणं अजून बाकी आहे थकलो नाही, थांबणं अजून बाकी आहे डाव टाकलास तू मान्य आहे मला पण माझं खेळणं अजून बाकी आहे लग्नाचा विचार नको करू तू माझ्या प्रेमात माझं रडणं अजून बाकी आहे तू साजरा नको करू आनंद विजयाचा कारण माझं हरणं अजून बाकी आहे वाट नको पाहू आताच शेवटाची माझ्या आयुष्य माझं हे जगणं अजून बाकी आहे   प्रविण & ओमकार  9853282222

दोस्ता

इमेज
नको रे करू धूम्रपान माझ्या प्रिय दोस्ता जीव नाही रे तुझा एवढा ही सस्ता धोक्यात जीव तुझा हे असूनही माहिती कसाकाय आवडतो तुला हाच रस्ता परिणाम याचे वाईट असेल तुम्हाला माहिती तरीही कसे मित्रांनो यात तुम्ही फसता मजे मजेत उडवता धूर सिगारेटचा जीव मात्र संकटात नि आनंदाने हसता किती सुंदर हे आयुष्य जग आनंदाने उगाच का त्या मृत्यू ला आमंत्रण देता ईच्छा नसेल जगायची तर मायबापाकडे बघा तुमच्यामुळे कश्याला त्या बिचाऱ्यांना दुःखात टाकता शेवट त्या बाईचा पायाखाली होतो सिगारेट नव्हे तुम्ही तर आयुष्य तुडवता प्रविण & ओमकार  9853282222

जात

शोधू नको जात, तुला सापडणार नाही विचारू नको मी ही सांगू शकणार नाही मारल्या किती ही बोंबा जातीच्या यावरी विश्वास माझा बसणार नाही मानुसकी हीच जात माहिती मला बाकी काही मी मानणार नाही रक्त आपलं हे लाल भडक भगवं-नीळ कधी निघणार नाही आहोत आपण सारे भारतीय यात जातीची भिंत उभारणार नाही लढेन नेहमी न्याय हक्कासाठी जातीसाठी कधी लडणार नाही आज तोंड दाबाल तुम्ही माझं ही प्रथा कोणी बंद ठेवणार नाही प्रविण & ओमकार  9853282222

आता

इमेज
होय मी दमलोय आता जरासा थांबलोय आता या स्वार्थी दुनियेत एकटा रमलोय आता तू असशील परिपूर्ण मी कुठे जमलोय आता लढून या अन्यायाशी जरासा थकलोय आता रोजच्या या दुराचाराने पुरता चिडलोय आता करेन भरपूर काही जरासा विसावलोय आता शेवट झाला जरी आज आयुष्य भरभरून जगलोय आता ओमकार & प्रविण   9853282222  9356045939