बा...!



दिसता तुज पायाच्या भेगा,
फार टोचतात माझ्या काळजा;
मज लाड पुरविण्यास बा,
सोसल्या तू कैक इजा..

राब राब राबतो तू,
कसली रे तुझी ही सजा;
सार विश्व मरेन भुकेनं, 
जर झालास तू वजा..

घामावरी करीतो तू शेती,
तव भेटत यासनी खायला;
पर बा येईल का रे कोणी ?
निस्तराया तुझ्या या दुःखाला..

कळेना तुज काही सण-वार,
दिसरात शेतामंदीच खपतो;
बनेल असल तुझं फाटलेलं,
मज मात्र इमानदारी शिकवितो..

दुष्काळात दिसतो बा मज,
वाळक्या बाभळीस तू टांगलेला;
राजकारण्यांना नाही परवा याची,
खेळ त्यांचा टिकांचा रंगलेला..

बा सांगुन दे त्या निधड्या सरकारला,
नको कर्ज, फकस्त पिकास योग्य भाव द्या;
लागलच तुम्हाला कधी तर,
माझ्यापासनं लागलं तेवढं कर्ज घ्या..

प्रविण & ओमकार
9853282222
9356045939

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हरवलेलं आयुष्य

उचकी

आता