लावला जीव किती
लावला जीव किती तुझ्यावरी चुकले माझे हिशोब मात्र आयुष्याचे सारे हुकले माझे मागू आणखी किती दिवस तुला देवाकडे फार झालं आता हात ही हे थकले माझे निर्णय घेतलासच मला सोडण्याच्या तू यापुढे नशिबही हे आता झुकले माझे लावावीसी वाटली हजेरी तुझ्या लग्नाला पाय मात्र थोड्याच अंतरी रुकले माझे एवढे दुःख माझ्याच नशीब का रे देवा जणू सुख सार कुठे तरी तू विकले माझे © प्रविण जाधव