#थप्पड
#थप्पड
( दिग्दर्शक: अनुभव सिन्हा )
कंपनी कडून लंडन ला बॉस म्हणून जायचं फिक्स झाल
घरात एक छान अशी पार्टी ठेण्यात आली पार्टी साठीची सगळी तयारी झाली पार्टी सुरू झाली पण अचानक एक कॉल येतो आणि
उद्याला लंडन ला तुम्ही बॉस म्हणून नाही तर दुसऱ्या एका परदेशी बॉस च्या हाताखाली काम करण्यासाठी जाणार आहात
मग मी आजवर जी मेहनत केली ती कोणासाठी आणि कशासाठी???
याच वादाला दोन पुरुषात सुरुवात होते आणि त्याचा बळी ठरते ती एक स्त्री.......
सगळ्या घरच्या, बाहेरच्या लोकांसमोर तिला जोरात कानाखाली लावण्यात आली...
कशासाठी??
जीन तुमच्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना बाजूला सारून तुमच्यात आनंद, प्रेम शोधलं ते टिकवण्यासाठी तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता दिवसरात्र तुमची सेवा सुश्रुषा केली, मोकळं जग सोडून तुमच्या चार भिंतीच्या आत समाधान शोधलं,
स्वतःच्या अपेक्षा, करीयर, स्वप्न, भविष्य या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून तुमच्यात आनंद शोधून तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला
आणि तुम्ही तुमच्या स्वप्नाला ठेच पोहोंचली म्हणून त्याचा राग तुम्ही तिच्यावर काढावा तेही चार चौघात
आणि झालेलं सगळं विसरून कॉम्प्रोमाईज करून परत तुमच्यासाठी जगावं तुम्हाला आनंदी करावं??
म्हणजे तिला स्वतःच अस काहीच नाही का ??
ती तुमची मक्तेदारी आहे का?
खरंच तिच्यावर तुमचा हक्क आहे का?
अजून खूप काही ....
पण यात फक्त त्याचा दोष नव्हता
यात दोष आहे तिच्या आईचा, सासूचा, त्या रुढीतल्या प्रत्येक स्त्रीचा आणि पुरुषाचा जे तिला कायम सांगत आले की बायकांनी अॅडजस्ट करून संसार करावा
घरात अस भांडी वाजतच असतात आपणच समजून घ्यायचं असतं...
अस अजिबात नसत हो ...
जिथं तुम्ही तुमची मान मर्यादा, अस्तित्व, स्वप्नासाठी जगता ना मग तिलाही तीच अस्तित्व, मान मर्यादा, स्वप्न यासाठी का जगू दिलं जात नाही
सगळं सगळं नसेल
पण तिला तिचा स्वतःचा अभिमान स्वाभिमान यासाठी तरी तीन स्वतः निर्णय घेऊन जगणं महत्वाचं आहे
कारण जेवढे तुम्ही आहात तेवढी तीपण आहे
कारण ती तुमचा हक्क नाही गुलाम नाही जहागीरदारी नाही ती तुमची साथीदार आहे हे कायम लक्षात ठेवा!!!
ज्यादिवशी इथं तिला स्वतःच्या मर्जिन पुरुषांप्रमाणे जगायला मिळेल तेव्हाच इथं प्रत्येक दिवस हा महिला दिन असेल !!
बाकी भारत हा पुरुषप्रधान देश आहे हे आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आणि वागवण्यात आलय म्हणून हे सगळं पटायला सहजपणे मान्यता मिळणार नाही हे ही तितकंच सत्य आहे❣️❣️❣️
#पुरुषत्व
#मक्तेदारी
#गुलामी
@Mr.Devil..

टिप्पण्या