जात...

जन्मापासून मरेपर्यंत,
जी जात नाही ती "जात"...

कर्माने मिळायला हवी होती जात,
पण, धर्मांनी दिली ही जात...

आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात,
राजकारणाची कोणती हो "जात"???

शोधल मी वृक्षात,
परोपकारात धन्यता हीच त्यांची "जात"...

एकोपा निर्माण करी मानवात,
सर्व जातीचा बोध "मानवता" हीच खरी जात...

            -ओमकार जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हरवलेलं आयुष्य

उचकी

आता