बाप

बाप माझा दुःखाच्या आसवांना, 
डोळ्यावाटे का वाहू देत नसावा; 
आमच्या सुखासाठी धडपडतो,
अन आम्हाला का कळू देत नसावा.. 
 
आईला बाबांचा सुखदुःख कळतच, 
पण आम्हा भावंडांना कधी सांगत नाही; 
माझे स्वप्न पूर्ण करता करता, 
त्यांना त्यांचे स्वप्न कळत नाही.. 

बाबा तुझी धडपड मला कळते रे,
तू माझ्याकडून निस्वार्थ अपेक्षा करत असतो; 
धडपड बघून मी पण, 
मग दिवसरात्र एक करत असतो..

तुझ्या जीवनातल्या अडचणीतही,
तू मात्र इमानदारी बाळगत असतो;
इमानदार बाप माझा मलाही, 
इमानदारी शिकवत असतो..

© ओमकार जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हरवलेलं आयुष्य

उचकी

आता