दिलाची राणी
येताना बघतेस
जाताना बघतेस
येताना बघतेस
जाताना बघतेस
बघताना जवा तू हसतेस
बघताना जवा तू हसतेस
कशी दिसते परिवानी ग
आहेस माझ्या दिलाची राणी
तुझ्या डोळ्यात बघतो
मी तिथंच थांबतो
तुझा ओठांना बघतो
तुझ्या प्रेमात पडतो
तुझा लाजरा मुखडा
सदा डोळ्यासमोर येतो
का लाजते लाजाळूवाणी ग
कशी दिसते परी वाणी ग
आहेस माझ्या दिलाची राणी
जवा तू निघते सारे तुलाच बघते
तुझ्या चालीवर राणी
शिट्टी मारावी वाटते
जवा मला तू लाईन देते
बनवलं माझ्यासाठी तुला देवानी ग
कशी दिसते परि वाणी ग
आहेस माझ्या दिलाची राणी
राती येते सपनी
जाते मला घेउनी
नेते अश्या ठिकाणी
जिथं नसतया कुणी
हाथ तुझा हाती माझ्या
जणू माझी तू संगिनी ग
कशी दिसते परि वाणी ग
आहेस माझ्या दिलाची राणी
तुझ्या प्रेमाच्या सागरात
मी आनंदी पोहतो
आनंदाच्या भरात
प्रेमात वाहुनी जातो
तुझ्या प्रेमाच्या नशेत
डुलतोय दारुड्या वाणी ग
कशी दिसते परि वाणी ग
आहेस माझ्या दिलाची राणी
कशी दिसते परि वाणी ग
आहेस माझ्या दिलाची राणी
© प्रविण जाधव
टिप्पण्या